भाजप नाकारणार नितीशकुमारांची मागणी

June 23, 2010 3:19 PM0 commentsViews: 7

23 जून

बिहारमधील विधानसभा निवडणूक प्रचारापासून नरेंद्र मोदींना दूर ठेवले जावे, ही मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मागणी भाजप मान्य करणार नाही असे दिसत आहे.

भाजप-जनता दल युती कायम ठेवण्यासाठी कोणत्याही पूर्वअटी मान्य करण्यास भाजपने नकार दिला आहे. जेडीयूसोबतची 15 वर्षांची युती टिकावी, अशी भाजमधील एका गटाची इच्छा आहे.

पण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना बिहारमधील प्रचारात घेऊ नये, असे जेडीयूने भाजपला ठणकावले आहे. हा तणाव कमी करण्यासाठी भाजपनेच पुढाकार घेतला आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विश्वास यात्रेत भाजपचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी भाग घ्यावा, असा आदेश पक्षाने दिला आहे.

close