स्कूल बस पॉलिसीला मान्यता

June 24, 2010 10:44 AM0 commentsViews: 8

24 जून

स्कूल बस पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यासाठी स्वतंत्र कायदे आणि नियमावली करण्यात आली आहे.

आता स्कूल बसना लायसन्स देण्यात येणार आहे. रिक्षांना लायसन्सप्रमाणेच विद्यार्थ्यांची ने-आण करता येईल.

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे.

हे शालेय बस धोरण कसे असेल ते पाहूया…

ऑटोरिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक ठरलेल्या आसनक्षमतेप्रमाणेच होणार

बससाठीही विद्यार्थी वाहतुकीचे परमीट देताना ठरलेल्या आसनक्षमतेएवढेच विद्यार्थ्यी नेण्याची परवानगी

स्कूलबसमध्ये शाळेचा अटेंडंट असणे आवश्यक

स्कूल बसच्या वेगावर नियंत्रण ठेवणारा स्पीड गव्हर्नर असणे आवश्यक

जर शाळेच्या बसला अपघात झाला तर संबंधित मुख्याध्यापक किंवा संबंधीत स्कूलबसच्यामॅनेजरला जबाबदार धरणार

प्रत्येक बसला खिडक्यांना संरक्षक जाळ्या लावणे बंधनकारक

बसमध्ये संकटकालीन दरवाजे असणे अनिवार्य

नव्या बसेस सुरू केल्यास शाळांना वर्षाला एका आसनामागे वर्षाला शंभर रुपये टॅक्स लावला जाणार

शाळेने एसी बस सुरू केली तर पूर्णत: टॅक्स सवलत दिली जाणार

महानगरपालिका क्षेत्रात एका वर्षानंतर रिक्षेतून शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर बंदी आणली जाणार

तर नगरपालिका क्षेत्रात दोन वर्षांनंतर आणि इतर भागात तीन वर्षांनंतर बंदी आणली जाणार

close