सायना जागतिक रँकिंगमध्ये तिसरी

June 24, 2010 10:59 AM0 commentsViews: 5

24 जून

भारताच्या सायना नेहवालने जागतिक रँकिंगमध्ये तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे.

नुकतीच सायनाने सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. याअगोदर तिने इंडियन ओपन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता.

एकाच आठवड्यात सलग दोन स्पर्धा जिंकण्याचा सायनाला फायदा झाला आहे. आणि तिने थेट सहाव्या स्थानावरुन तिसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे.

सिंगापूर सुपर सीरिज हे सायनाचे दुसरे सुपर सीरिज टायटल ठरले आहे. याअगोदर गेल्या वर्षी तिने इंडोनेशिया सुपर सीरिज स्पर्धा जिंकली होती.

close