कांद्याचे लिलाव बंदच

June 24, 2010 3:37 PM0 commentsViews: 1

24 जून

नाशिकमधील कांद्याचे लिलाव आज सहाव्या दिवशीही बंदच आहेत. लेव्हीच्या मुद्दयावरून हे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्‍यांनी घेतला आहे.

या प्रश्नावर आज पिंपळगाव बसवंत इथे व्यापार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांसोबत शिवसेनेने आंदोलन छेडले आहे सटाण्यामध्ये तहसीलदार कार्यालयासमोर सडलेला कांदा रस्त्यावर फेकून या आंदोलनाचा निषेध करण्यात आला.

माथाडी कामगारांची लेव्ही कुणी भरायची या वादातून जिल्ह्यात कांद्याची खरेदीविक्री बंद करण्यात आली आहे. यातून आत्तापर्यंत 30 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे.

close