पेट्रोल, डिझेल, गॅस महागला

June 25, 2010 9:27 AM0 commentsViews: 15

25 जून

पेट्रोल-डिझेल दरवाढीला अखेर केंद्रीय मंत्रिसमूहाने मान्यता दिली आहे.

पेट्रोलचे दर 3.50 रुपयांनी, तर डिझेल 2 रुपयांनी महागले आहे.

घरगुती गॅसच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. स्वयंपाकाचा गॅस 35 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ सोसावी लागणार आहे.

रॉकेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. तब्बल 8 वर्षांनंतर रॉकेलचे दर 3 रुपयांनी वाढणार आहेत. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होईल.

पेट्रोलच्या दरावरील सरकारी नियंत्रण हटवण्यात आले आहे. पण डिझेलच्या दरावरील नियंत्रणाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही.

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिसमूहाने या दरवाढीला मान्यता दिली आहे.

आधीच जनता महागाईने त्रस्त असताना आता या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.

आता पाहूया राज्यातील कोणत्या शहरांमध्ये किती दरवाढ होणार आहे…

मुंबई

पेट्रोल – सध्याचा दर – 52.30 पैसेनवीन दर – 55.80

डिझेल – सध्याचा दर – 41.68 पैसैनवीन दर – 43.68

नागपूर, शहर

पेट्रोल – सध्याचा दर – 53.68 पैसे नवीन दर – 57.50 रुपये

डिझेल – सध्याचा दर – 41.61 पैसे नवीन दर – 42.61 पैसे

शहराबाहेरील दर –

डिझेल – 39.42 पैसे नवीन दर – 41.42 पैसेपेट्रोल सध्याचा दर – 51.05 पैसे नवीन दर – 54.55 पैसे

औरंगाबाद

पेट्रोल – सध्याचा दर – 51. 26 पैसेनवीन दर- 54.71

डिझेल – सध्याचा दर – 39. 61 पैसेनवीन दर – 41.61

close