नागपुरात स्कूलबस धोरणाला विरोध

June 25, 2010 9:41 AM0 commentsViews: 2

25 जून

नागपूरमध्ये आज ऑटो चालक संघटनेने परिवहन मंत्र्यांचा पुतळा जाळला. शालेय विद्यार्थांना ने आण करण्यार्‍या बस आणि ऑटो रिक्षा संदर्भात नवीन निकष सरकारने गुरुवारी जाहीर केले होते.

ऑटो रिक्षांना लायसन्स प्रमाणेच विद्यार्थ्यांची ने-आण करावी लागेल. तसेच चालकांना आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थांना नेता येणार नाही, असे सरकारने ठरवलेल्या नवीन धोरणात म्हटले आहे.

याचाच निषेध करत नागपूर जिल्हा ऑटो चालक संघटनांनी नागपूरच्या आरटीओ चौकात परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.

close