नेमाडेंची ‘हिंदू’ 15 जुलैला येणार

June 25, 2010 10:05 AM0 commentsViews: 3

25 जून

गेले तीन दशके प्रतिक्षेत असलेली भालचंद्र नेमाडे यांची हिंदू ही कादंबरी येत्या 15 जुलैला प्रकाशित होत आहे.

कोसला तसेच बिढार, जरीला, झूल या कादंबर्‍यांनंतर नेमाडे यांनी 1979 मध्ये हिंदू कादंबरी लिहित असल्याचा घोषणा केली.

'हिंदू सस्कृती ही आजकालची संस्कृती नसून, तिला खूप मोठी परंपरा आहे. या संस्कृतीचा पसारा तो अडगळ वाटत असला तरीही माणसाचे आयुष्य समृद्ध करत असतो' असे नेमाडे यांनी हिंदू कादंबरीविषयी बोलताना म्हटले.

म्हणूनच कादंबरीतील नायक आता प्रचलित असलेल्या हिंदुत्वाच्या व्याख्येपेक्षा हिंदुत्वाची वेगळी व्याख्या करतो, असेही ते म्हणाले.

close