कॉमनवेल्थची क्वीन्स बॅटन भारतात

June 25, 2010 10:14 AM0 commentsViews: 2

25 जून

भारतात ऑक्टोबर महिन्यात कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या क्वीन्स बॅटनने पाकिस्तानातून वाघा बॉर्डरमार्गे भारतात प्रवेश केला आहे.

पाकिस्तान ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल सय्यद अरिफ हसन यांनी भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्याकडे बॅटन सुपूर्द केली.

बॅटनच्या स्वागतासाठी वाघा बॉर्डरवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

भारतातील 100 दिवसांच्या प्रवासात बॅटन सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये फिरेल. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या 3 दिवस आधी म्हणजेच 30 सप्टेंबरला 20 हजार किलोमीटरचे अंतर पार करून ही बॅटन दिल्लीत पोहोचेल.

या अगोदर 9 सप्टेंबरला क्वीन्स बॅटन महाराष्ट्रात दाखल होणार आहे. 10 सप्टेंबरला पुण्यात तर 11 आणि 12 सप्टेंबरला बॅटन मुंबईत येणार आहे.

close