शिवरायांवर सिनेमा येणार

June 25, 2010 10:23 AM0 commentsViews: 5

25 जून

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला कळावा या उद्देशाने चंद्रकांत प्रोडक्शन एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिनेमाची निर्मिती करणार आहे. हा सिनेमा 2012 पर्यंत पूर्ण होईल, अशी घोषणा मुंबईत करण्यात आली.

2012 मध्ये शिवराज्याभिषेकाच्या दिवशी रायगडावर हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा मानस नितीन देसाई यांनी व्यक्त केला आहे.

शिवछत्रपती या टीव्ही मालिकेच्या 16 भागांचा डीव्हीडी संच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रकाशित केला.

या कार्यक्रमात देसाई यांनी ही घोषणा केली. या प्रकाशन सोहळ्याला अर्थमंत्री सुनील तटकरे, आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर, असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

close