बेस्ट फाईव्हवर राष्ट्रवादीचा सरकारला घरचा आहेर

June 25, 2010 12:43 PM0 commentsViews: 2

25 जून

बेस्ट फाईव्हच्या मुद्यावर हायकोर्टाने सरकारला चपराक लगावली आहे. तर सरकारच्या अपयशावरून सर्वत्र टीका होत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही सरकारला घरचा आहेर दिला आहे.

बेस्ट फाईव्हचा निर्णय एसएससी बोर्डाचा आहे हे राज्यसरकारचे म्हणणे चुकीचे आहे. बेस्ट फाईव्ह प्रकरणी सरकारने काय तयारी केली होती, कोणी गलथानपणा केला, या सर्व बाबींचा तपशील शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांना द्यावा लागेल.

या प्रकरणी बेस्ट फाईव्हचा जीआर न काढता अध्यादेश काढून निर्णय घ्यायला हवा होता, आणि अधिवेशनात तो पारीत करून घेता आला असता. पण राज्य सरकारने जीआर काढण्याची चूक केली, अशा शब्दात राष्ट्रवादीचे गुरूनाथ कुलकर्णी यांनी टीका केली आहे.

विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज बेस्ट ऑफ फाईव्हच्या विरोधात मंत्रालयात आंदोलन केले.

या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या केबिनवर धडक मारून घोषणाबाजी केली.

यावेळी मंत्रालयाची सुरक्षाव्यवस्था किती ढिसाळ आहे, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले. एवढे सगळे कार्यकर्ते मंत्रालयात घुसल्यानंतरही पाच ते सात मिनिटांपर्यंत एकही सुरक्षा कर्मचारी त्या ठिकाणी आला नव्हता.

close