दाऊदसाठी मुंबईत काम करणार्‍या दोघांना अटक

June 25, 2010 1:00 PM0 commentsViews: 2

25 जून

दाऊदसाठी मुंबईत काम करणार्‍या नसीर अहमद शेख आणि अली हसन यांना शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक करण्यात आली आहे.

एटीएसने ही कारवाई केली. विक्रोळी आणि जुहू इथून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक कार्बाईन, सात पिस्तुले आणि 74 कार्टरेज जप्त करण्यात आलीत.

अली हसन छोटा शकील आणि दाऊद यांचे मुंबईत नेटवर्क वाढवण्याचे काम करीत होता.

close