नागपूर शिवसेनेत अंतर्गत वाद

June 25, 2010 1:40 PM0 commentsViews:

25 जून

नागपूरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

शिवसेनेचे उपमहापौर शेखर सावरबांधे यांच्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांनी बंड पुकारले आहे. सावरबांधे यांच्याविरुध्द सेनेच्याच नगरसेवकांनी पोस्टरबाजी केली.

एवढेच नाही तर सावरबांधे यांना सापाचीही उपमा या बॅनर्सवर देण्यात आली आहे. याशिवाय पालिका परिसरातच सावरबांधे यांच्याविरोधात नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

close