दापोलीजवळ डोंगराला भेगा

June 25, 2010 1:55 PM0 commentsViews: 10

25 जून

दापोलीजवळच्या कर्दे गावानजिकच्या डोंगराला भेगा गेल्यामुळे डोंगर सरकायला लागला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दोन वाड्यांतील 45 कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे.

हर्णे राजवाडी येथील दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर लगेचच हा प्रकार घडल्याने प्रशासनाने या 35 घरांना स्थलांतराच्या नोटीसा बजावल्या आहेत. मात्र स्थलांतर कुठे करायचे हा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.

प्रशासनाने या गावातील प्राथमिक शाळेत या कुटुंबांना जाऊन राहायला सांगितले. मात्र शाळेची जागा 45 कुटुंबांना सामावून घेण्यास अपुरी पडत आहे. त्यामुळे ही कुटुंबे सध्या जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

close