नाशिकमध्ये लिलाव बंद, कांदा सडला…

June 25, 2010 2:01 PM0 commentsViews: 2

25 जून

नाशिकमध्ये कांद्याचा प्रश्न चिघळला आहे. गेल्या 8 दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत.

लेव्ही प्रश्नी व्यापार्‍यांनी छेडलेल्या या आंदोलनाबद्दल आतापर्यंत चर्चा आणि बैठकांच्या बर्‍याच फेर्‍या झाल्या. पण तोडगा काही निघाला नाही. त्यातच कांदा कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्यामुळे एकीकडे शेतकर्‍याचे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे किरकोळ बाजारातील कांद्याच्या किंमती वाढून सामान्य ग्राहकाच्या खिशालाही चाट बसणार आहे.

यातून मार्ग काढण्यात पणन महासंघाला अपयश आले आहे.

close