दरवाढीला देशभर विरोध

June 26, 2010 11:29 AM0 commentsViews: 5

26 जून

पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ आजपासून लागू झाली आहे. या दरवाढीला आज देशभरात विरोध होत आहे. विरोधकांनी या विरोधात देशभर आंदोलने सुरू केली आहेत.

भाजपने कालच आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची सुरूवात भाजपने दिल्लीपासून केली. मुंबईत देखील विरोधक आक्रमक झाले.

आंदोलन करणार्‍या भाजपच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यात औरंगाबाद, नागपुरातही निषेध मोर्चा काढण्यात आला. तर केरळमध्येही डाव्यांनी दरवाढी विरोधात आंदोलन पुकारले.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये बंद पुकारण्यात आला आहे.

close