शाहू महाराजांची जयंती उत्साहात

June 26, 2010 12:44 PM0 commentsViews: 12

26 जून

महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदूत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 136 वी जयंती आहे.

या निमित्ताने कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी बावडा येथील शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाहू महाराजांना अभिवादन केले.

त्यानंतर दसरा चौक येथील शाहू महाराज यांच्या पुतळ्यालाही मानवंदना देण्यात आली. यावेळी कोल्हापूर शहरातील शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या कार्यक्रमानंतर शहरात रॅली काढण्यात आली. त्यामध्ये शाहूंच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणार्‍या चित्ररथाचा समावेश होता.

close