कांदा लिलाव नवव्या दिवशीही बंद

June 26, 2010 1:10 PM0 commentsViews: 4

26 जून

नाशिकमध्ये कांद्याच्या लिलाव बंदीचा आज नववा दिवस आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लेव्हीच्या मुद्द्यावरून व्यापार्‍यांनी खरेदीवर बहिष्कार घातला आहे.

पुण्या-मुंबईच्या व्यापार्‍यांच्या मदतीने बाजार सुरू करण्याचा पर्याय पणन खात्याने समित्यांना दिला आहे.

कांद्याचे सर्वात मोठे मार्केट असलेल्या लासलगाव बाजार समितीने त्यासाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे.

मात्र लेव्हीचा मुद्दा कायमचा निकालात निघत नाही, तोपर्यंत खरेदी न करण्याच्या भूमिकेवर व्यापारी ठाम आहेत.

close