सायनाची आगेकूच कायम

June 26, 2010 2:54 PM0 commentsViews: 3

26 जून

भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने इंडोनेशिया सुपर सीरिजमध्ये आपली आगेकूच कायम ठेवली आहे.

तिने स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जपानच्या एरिको हिरोसेचा तिने 21-9, 21-10 असा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे.

या मॅचमध्ये सायनाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी एरिकोला जराही संधी दिली नाही.

नुकत्याच जागतिक क्रमवारीत तिसर्‍या नंबरवर पोहोचलेल्या सायनाची आता फायनलमध्ये गाठ पडेल ती, जपानच्या सायाको साटोशी.

close