पाकिस्तानात शस्त्रे घेऊन जाणारे जहाज पकडले

June 26, 2010 3:17 PM0 commentsViews: 5

26 जून

एकीकडे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम हे पाकिस्तानात दहशतवादाच्या मुद्दयावर चर्चा करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र घेऊन जाणारे एक मोठे जहाज पश्चिम बंगालमध्ये पकडण्यात आले आहे.

या जहाजात मोठ्या प्रमाणात लष्करी साहित्य आणि स्फोटके सापडली आहेत. लिबेरियाचे रजिस्ट्रेशन असलेले हे जहाज बांग्लादेशमधील चितगावहून कराचीला निघाले होते.

या जहाजात स्फोटकांशिवाय अँन्टी एअरक्राफ्ट गन्स, रॉकेट लाँचर्स, अश्रूधुराच्या नळकांड्यांचा मोठा साठा आहे.

गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनंतर नौदल, कोस्टगार्ड आणि पोलिसांनी हे जहाज ताब्यात घेतले आहे. तसेच कागदपत्रांची तपासणी सुरू असून, जहाजावरील कर्मचार्‍यांचीही चौकशी केली जात आहे.

close