पुन्हा चर्चा विलीनीकरणाची…

June 28, 2010 11:25 AM0 commentsViews: 1

28 जून

आता राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाची.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात यावा, अशी मागणी शरद पवारांचे निकटवर्तीय रत्नाकर महाजन यांनी केली आहे.

यासंदर्भातील पत्रच त्यांनी शरद पवार यांना दिले आहे.

सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्यावर बाहेर पडून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला.

पण आता सोनियांचा परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा संपला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, अशी मागणी महाजन यांनी केली आहे.

close