राजू शिंदेंचे भाजपलाच आव्हान

June 28, 2010 11:44 AM0 commentsViews: 1

28 जून

औरंगाबाद महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा वाद सुटता सुटत नाही.

भाजपने राजू शिंदे अध्यक्षपद सोडतील, अशी घोषणा काल केली होती. पण आज 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना शिंदे यांनी अध्यक्षपद सोडण्यास स्पष्ट नकार दिला.

तसेच आपल्यासोबत भाजपचे दोन कार्यकर्ते असल्याचा दावाही राजू शिंदे यांनी केला. पण राजू शिंदे यांना पक्षाचा आदेश मानावाच लागेल.

त्यांनी पक्षाचा आदेश नाही मानला तर, त्यांची पक्षातून हकालपट्टी करू, अशी कठोर भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे.

close