पुण्यात रक्तरंजित दरोडा

June 28, 2010 12:36 PM0 commentsViews: 1

28 जून

पुण्यातील गजबजलेल्या लक्ष्मीरोडवरील एका ज्वेलर्सवर आज भरदिवसा रक्तरंजित दरोडा घालण्यात आला.

महेंद्र ज्वेलर्सवर घातलेल्या या दरोड्यात मालक जबर जखमी झाला.

10 दरोडेखोरांनी मिळून हा दरोडा घालण्याचा प्रयत्न केला.

बहाद्दर पुणेकरांनी दोन दरोडेखोरांना पकडून दिले आहे. त्यांना लोकांनी चांगलाच चोपही दिला.

या दरोडेखोरांना पकडून दिलेल्या लोकांचा सत्कार करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान पोलिसांनी आणखी6 दरोडेखोरांना अटक केली आहे.

यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील नागरिकांची सुरक्षा चर्चेत आली आहे.

close