वसई-विरारच्या महापौरपदी राजीव पाटील

June 28, 2010 1:36 PM0 commentsViews: 22

28 जून

वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौरपदी राजीव पाटील यांची निवड झाली आहे.

वसई-विरार महानगरपालिकेची घोषणा झाल्यानंतर पार पडलेल्या निवडणुकांनंतर आज विशेष सभा झाली.

त्यात त्यांची निवड करण्यात आली. मात्र या पदासाठी हितेंद्र ठाकूर यांचे चुलतभाऊ पंकज ठाकूर यांनीही अर्ज दाखल केल्याने त्यांच्यात चुरस वाढली आहे.

अल्पसंख्य समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सगीर डांगे यांचे नावही उपमहापौर पदासाठी आघाडीवर आहे. तर भरत गुप्ता, जितेंद्र शहा हेही उपमहापौरपदासाठी स्पर्धेत आहेत.

close