गोरेगावमध्ये शिवसेनेचे राजन पाध्ये विजयी

June 28, 2010 1:42 PM0 commentsViews: 7

28 जून

गोरेगाव पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या श्रीकला पिल्ले यांचा शिवसेनेच्या राजन पाध्ये यांनी पराभव केला. 2032 मतांनी श्रीकला यांचा पराभव झाला.

काँग्रेसचे नगरसेवक आर. पिल्ले यांचे निधन झाल्याने इथे पोटनिवडणूक झाली. शिवसेनेचे राजन पाध्ये आणि काँग्रेसच्या श्रीकला यांच्यात प्रमुख लढत होती.

मनसेनही आपला उमेदवार रिंगणात उतरवला. त्यामुळे ही निवडणूक सेनेला कठीण जाणार, असे बोलले जात होते.

पण शेवटी सेनेने बाजी मारली. त्यामुळे आता मनपातील शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांची संख्या 116 वर गेली आहे.

close