राष्ट्रपतींनी केली 8 जणांची फाशी रद्द

June 28, 2010 2:06 PM0 commentsViews: 2

28 जून

राष्ट्रपतींनी 8 जणांच्या फाशीची शिक्षा बदलून, त्यांना जन्मठेप देण्याचे आदेश दिले आहेत. फाशींची शिक्षा झालेल्यांच्या दया याचिकेवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

2 वेगवेगळया केसेसमध्ये 8 जणांना फाशी झाली होती. एका केसमध्ये 6 जणांच्या फाशीची शिक्षा 1997 पासून प्रलंबित होती.त्यांनी उत्तर प्रदेशमधील 5 जणांचा खून केला होता. त्यात एका 10 वर्षांच्या मुलाचाही समावेश होता.

तर दुसर्‍या एका केसमध्ये 5 जणांच्या कुटुंबाची हत्या केल्याबद्दल दोघांना फाशी सुनावण्यात आली होती.त्यांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. त्यांची शिक्षा जन्मठेपेत परावर्तीत करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे आता अफझल गुरू आणि कसाबच्या फाशीसंबंधी लवकरच निर्णय होण्यास गती मिळेल. कारण याआधी फाशी झालेल्या तब्बल 30 जणांच्या दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहेत.

close