ब्राझीलची गाठ चिलीशी

June 28, 2010 2:31 PM0 commentsViews: 3

28 जून

फूटबॉल वर्ल्डकपमध्ये विजयाचे प्रबळ दावेदार मानले जाणार्‍या ब्राझीलची आज गाठ पडत आहे, ती चिलीशी. दोन्ही टीमने लीगमॅचमध्ये प्रत्येकी दोन विजय मिळवले आहेत.

चिलीने ग्रुपमध्ये स्वित्झर्लंड आणि होन्डुरासचा पराभव करत बाद फेरीत गाठली. पण आता त्यांचा सामना आहे तो बलाढ्य ब्राझीलशी.

कार्लोस डुंगा यांच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या ब्राझीलची कामगिरी जबरस्त होत आहे. पोर्तुगालविरुध्दच्या शेवटच्या लीगमॅचमध्ये त्यांनी स्टार खेळाडूंना विश्रांती दिली होती. पण आता बादफेरीच्या या मॅचसाठी ब्राझीलची टीम पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल.

काका, रॉबिन्हो, फॅबिनो असे स्टार खेळाडू या टीममध्ये आहेत. पण ही बाद फेरीची मॅच असल्यानं चिलीची टीमही वेगळ्या रणनितीसह उतरेल.

चिलीचे जारा, पोन्स आणि मेडेल यांनी लीगमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे ब्राझीलला तोडीस तोड उत्तर देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

close