कांद्याचे लिलाव 11व्या दिवशीही ठप्प

June 28, 2010 2:43 PM0 commentsViews: 2

28 जून

नाशिकमधील कांद्याचे लिलाव 11व्या दिवशीही ठप्प आहेत. लेव्हीपासून व्यापार्‍यांची सुटका करण्याचा आदेश सरकार काढत नाही, तोपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचा व्यापार्‍यांचा निर्धार ठाम आहे.

दरम्यान नाशिक बाहेरचे व्यापारी आणून कांद्याचे लिलाव सुरू करण्याचा प्रयत्न पणन महासंघ करत आहे. बाहेरच्या व्यापार्‍यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी बाजार समित्यांनी दाखवली आहे.

त्यासाठी वाशी बाजार समितीत व्यापार्‍यांची बैठकही घेण्यात येत आहे. या सार्‍यात कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

close