ससूनमधून मुलाला पळवले

June 28, 2010 2:47 PM0 commentsViews: 1

28 जून

पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून एका 11 महिन्यांच्या मुलाला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नीरू गायकवाड या त्यांच्या वेदांत या मुलाला घेऊन शुक्रवारी ससूनमध्ये आल्या होत्या. त्यावेळी एक महिला वेदांतशी बोलत होती. त्यानंतर नीरू यांचे लक्ष नसल्याचे पाहून ती महिला वेदांतला घेऊन पळून गेली.

नीरू यांनी शोध घेतल्यानंतरही त्यांचा मुलगा सापडला नाही. शेवटी त्यांनी पोलीस तक्रार केली. पोलीस आता वेदांत आणि त्याला पळवणार्‍या महिलेचा शोध घेत आहेत.

close