दरोड्यातील आरोपींना चार तासांत अटक

June 28, 2010 3:08 PM0 commentsViews: 1

28 जून

पेट्रोलपंप दरोड्यातील आरोपींना चार तासात अटक करण्यात सोलापूर पोलिसांनी यश मिळवले आहे. या आरोपींना 30 लाखांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आले आहे.

या पेट्रोलपंपावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनीच हा दरोडा टाकल्याचे सिद्ध झाले आहे. आरोपींमध्ये माजी पोलीस आणि माजी सैनिकांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

सोलापूरजवळील वैजापूर हायवेवरील एका पेट्रोल पंपवर ही जबरी चोरी करण्यात आली. या दरोड्यात दरोडेखोरांनी जवळपास 30 लाखांची रोकड लुटली. रात्री तीनच्या सुमारास बंदूक आणि चॉपरचा धाक दाखवून ही रोकड लुटण्यात आली.

पेट्रोल पंपावरील वॉचमनलाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील 25 लाख रूपये जप्त केले. या दरोड्यातील एक आरोपी पाच लाखांसह फरार आहे.

close