देशातील सर्वात मोठ्या बोगद्याचे काम सुरू

June 28, 2010 3:16 PM0 commentsViews: 2

28 जून

देशातल्या सगळ्यात मोठ्या बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते आज हिमाचल प्रदेशात रोहतांग बोगद्याची पायाभरणी झाली.

या बोगद्यामुळे मनालीहून थेट लेह-लडाखसारख्या अतिशय दुर्गम भागाशी वर्षभर संपर्क साधणे शक्य होणार आहे. 3 हजार ते 4 हजार मीटर एवढ्या उंचीवर 8.8 किलोमीटरचा हा बोगदा बांधला जाईल.

पुढच्या पाच वषांर्त म्हणजे 2015 मध्ये या बोगद्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मनाली ते लडाख यांच्यातील तब्बल 46 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे. बोर्डर रोड्स ऑर्गनायझेशन या बोगद्याचे बांधकाम करणार आहे.

रोहतांग बोगद्याची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे…

- अतिशय महत्त्वाकांक्षी अशा या बोगद्यावर रुपये 1500 कोटी खर्च येईल

- 8.8 किमी लांबीच्या या बोगद्यामुळे लेहपर्यंत पोचणे आता वर्षभर शक्य होईल

- मनाली ते लेह हे अंतर 46 किलोमीटरने कमी होईल, चार तास वाचतील

- रोहतांग पासच्या खाली बनवण्यात येणार्‍या या बोगद्यात हवा खेळती राहण्यासाठी व्हेंटीलेशन डक्ट्स आणि पंखे बसवण्यात येणार आहेत

- दर 250 मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील

- एका वेळेस 1500 ट्रक्स आणि 3000 कार्स 80किमी/प्रतितास या गतीने जाऊ शकतील

close