‘कोकण रेल्वे विस्कळीत करू नये’

June 29, 2010 11:44 AM0 commentsViews:

29 जून

कोकण रेल्वेबाबत कोकणवासियांच्या समस्या योग्य असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. कोकण रेल्वेबाबतच्या समस्यांशी, रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पण कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत होईल, असे आंदोलन कुणीही करू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

त्यामुळे आता महसूलमंत्री नारायण राणे यांची कोंडी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. कारण कोकणवासियांच्या मागण्यांसाठी त्यांनी 9 जुलैला चक्का जामची घोषणा केली होती.

पण मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर राणे काय करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close