भाज्यांचे दर दुपटीने वाढले

June 29, 2010 11:51 AM0 commentsViews: 2

29 जून

घाऊक बाजारात भाज्यांचे दर कमी असतानाही किरकोळ व्यापार्‍यांनी भाजीच्या दरात दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे आधीच महागाईने वैतागलेल्या नागरिक या दरवाढीमुळे संतापले आहेत.

दरवर्षी पावसाळा आला की, भाज्या महागतात. पण यावर्षी उलटे चित्र आहे. ऐन पावसाळ्यातही नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक चांगली आहे.

त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांचे भाव 20 ते 25 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसत आहे. पण किरकोळ व्यापार्‍यांनी मात्र भाववाढ केल्याने भाज्यांचे भाव वाढले आहेत.

भाज्यांचे घाऊक आणि किरकोळ बाजारातील दर पुढीलप्रमाणे -

भाजीपाल्यांचे दर (1 किलो)

भेंडी – घाऊक – 22 ते 24 रूपयेभेंडी – किरकोळ – 48 ते 50 रूपये

वांगी – घाऊक – 10 ते 13 रूपयेवांगी – किरकोळ – 40 ते 45 रूपये

टोमॅटो – घाऊक – 18 ते 22 रूपयेटोमॅटो – किरकोळ-50 ते 55 रूपये

गाजर – घाऊक – 15 ते 20 रूपयेगाजर – किरकोळ – 55 ते 60 रूपये

फ्लॉवर – घाऊक – 10 ते 11 रूपयेफ्लॉवर – किरकोळ – 40 ते 45 रूपये

शेवगा – घाऊक – 25 ते 30 रूपयेशेवगा – किरकोळ – 60 ते 65 रूपये

कोबी – घाऊक – 7 ते 8 रूपयेकोबी – किरकोळ – 40 ते 45 रूपये

काकडी – घाऊक – 9 ते 10 रूपयेकाकडी – किरकोळ – 30 ते 32 रूपये

मिरची – घाऊक – 16 ते 20 रूपयेमिरची – किरकोळ – 55 ते 60 रूपये

दुधी भोपळा – घाऊक – 8 ते 9 रूपयेदुधी भोपळा – किरकोळ -30 ते 32 रूपये

मेथी – घाऊक – 10 ते 12 रूपयेमेथी – किरकोळ -25 ते 28 रूपये

कोथिंबीर – घाऊक – 6 ते 8 रूपयेकोथिंबीर – किरकोळ -15ते 20रूपये

पालक – घाऊक – 4 ते 7 रूपयेपालक – किरकोळ – 15ते 18 रूपये

close