महाजनांनी कुठेही विलीन व्हावे

June 29, 2010 12:10 PM0 commentsViews: 1

29 जून

राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाने आज पुन्हा एकदा स्वाभिमानाचा गजर केला. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसमध्ये विलिन व्हावे, असे आवाहनाचे पत्रच काल राष्ट्रवादीचे नेते रत्नाकर महाजन यांनी दिले होते.

त्यावर महाजनांनी त्यांना वाट्टेल तिकडे विलिन व्हावे, आमचा आमच्या ताकदीवर भरवसा आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसने आज व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदे घेऊन पक्षाची ही अधिकृत भूमिका स्पष्ट केली.

तसेच महाजनांवर कारवाईही करणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाजनांचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन करा ही मागणी करणारे रत्नाकर महाजन यांच्या विरोधात आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला.

रत्नाकर महाजन यांच्या हकालपट्टीचीही यावेळी मागणी करण्यात आली.

close