सायनाचे जल्लोषात स्वागत

June 29, 2010 12:52 PM0 commentsViews:

29 जून

भारताची सुपरस्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे मायदेशी भारतात जल्लोषात स्वागत झाले.

गेल्या तीन आठवड्यात सलग तीन सुपर ग्रांपी बॅडमिंटन स्पर्धा जिंकून सायनाने इतिहास घडवला आहे.

इंडियन ओपन, सिंगापूर ओपन आणि इंडोनेशियन ग्रांपी स्पर्धा जिंकत सायनाने विजेतेपदाची हॅट्‌ट्रीक साधली आहे.

या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर सायनाने जागतिक बॅडमिंटन क्रमावारीत तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे.

हे विजेतेपद पटकावल्यानंतर सायना भारतात परतली. तिच्या स्वागतासाठी विमानतळावर चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

close