पुण्यातील दरोडा प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

June 29, 2010 4:32 PM0 commentsViews: 18

29 जून

पुण्यातील महेंद्र ज्वेलर्सवर दरोडा घालणार्‍या सर्व 7 आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले.

यामधील 5 आरोपींना 8 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केल्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

या प्रकरणात 12 ते 13 आरोपी असून त्यातील 4 आरोपी हे पुण्यातील स्थानिक आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रभातकुमार यांनी दिली.

यामध्ये 29 लाखांचा मुद्देमाल, रिव्हॉल्वर, देशी कट्टा, चॉपर यांसारखी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

आज पुन्हा दरोडा

काल महेंद्र ज्वेलर्सवर भर दिवसा दरोड्याची घटना ताजी असताना त्याच रात्री आंबेडकरनगर झोपडपट्टी भागातील लक्ष्मी ज्वेलर्समध्यही दरोडा टाकण्यात आला.

या दरोड्यात ज्वेलर्सच्या दुकानातून दीड लाखांचे दागिने पळवले गेले. पुण्यातील सराफ व्यावसायिकांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.

सराफ संघटनेचा बंद

पुण्यातील दरोड्यांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी आज सराफ संघटनेने बंद पाळला. काल लक्ष्मीरोडवरील महेंद्र ज्वेलर्सवर 10 दरोडेखोरांनी दरोडा घालण्याचा प्रयत्न केला होता.

दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात महेंद्र ज्वेलर्सचे मालक गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी पुणेकरांनी दोन दरोडेखोरांना पकडून दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी आणखी दरोडेखोरांना अटक केली आहे.

या असुरक्षिततेला पोलीस कारणीभूत असल्याचा आरोप करत सराफ व्यावसायिकांनी बंदचे आवाहन केले होते.

close