रेहमान ऑस्करच्या निवड समितीवर

June 30, 2010 8:52 AM0 commentsViews: 2

30 जून

संगीतकार ए. आर. रेहमानची आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

स्लमडॉग मिलेनीअरसाठी ऑस्करसारखा सर्वोच्च बहुमान पटकवल्यानंतर आता त्याच्याही पुढचे पाऊल रेहमानने टाकले आहे.

ऑस्कर पुरस्कारांसाठीची नामांकने ज्या निवड समितीकडून दिली जातात, त्या समितीवर रेहमानची निवड झाली आहे.

रेहमानसोबतच रसुल पोकुट्टीलाही हा बहुमान मिळाला आहे.

सर्वोच्च पुरस्काराच्या नामांकन कमिटीतील या दोघांची निवड भारतीयांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.

close