अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा कडक

June 30, 2010 9:01 AM0 commentsViews: 3

30 जून

पवन बाली, काश्मिर

कधी अतिरेकी हल्ले तर कधी सोपोर येथील सीआरपीएफ जवानांचा अत्याचार… काश्मिरमध्ये नेहमीच हाय अलर्ट असतो. या सर्व घडामोडी बघता, यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

पहिल्या जथ्यातून हजार भाविक अमरनाथ यात्रेसाठी काश्मीरमध्ये गेले आहेत. आजपासून ही यात्रा सुरू होत आहे.

यंदा अंदाजे 4 लाख भाविक ही यात्रा करतील, असा अंदाज आहे. पण सोपोर येथील सीआरपीएफचे जवान आणि स्थानिकांमधील हिंसाचारात गेल्या दोन दिवसांत 3 स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या वर्षी अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे.

अंदाजे 70 टुरिस्ट कंपन्यांनीही या टूर पॅकेजमध्ये सुरक्षा सैनिकांची व्यवस्था केली आहे.

अमरनाथ यात्रा ही खर्‍या अर्थाने कठीण आहे. कारण हिंसक घटनांचा तणाव इथे आहेच, पण निसर्गाच्या लहरीपणाचाही इथे भरवसा नसतो. त्यामुळे ही यात्रा संपेपर्यंत प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार हे निश्चित.

close