शहीद जवानांची पार्थिव रायपूरमध्ये

June 30, 2010 9:23 AM0 commentsViews: 3

30 जून

नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 26 जवानांची पार्थिव आज रायपूरला आणण्यात आली. काल छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 26 जवान शहीद झाले.

एका कारवाईनंतर पायी परतत असताना एका टेकडीच्या माथ्यावरून नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. छत्तीसगडमधील नारायणपूर जवळच्या धोराईमध्ये ही घटना घडली. मंगळवारी दुपारी अडीच वाजता ही घटना घडल्याचे छत्तीसगड सरकारने सांगितले.

या हल्ल्यात 7 जवान जखमी झाले. त्यांना जगदलपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यात एकूण 66 जवान होते. त्यांना 150 ते 200 नक्षलवाद्यांनी घेरले आणि चकमक उडाली. यात 26 जवान मारले गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सीआरपीएफ कॅम्पपासून केवळ तीन किलोमीटरवर ही घटना घडली. या घटनेनंतर सीआरपीएफचे जादा जवान कॅम्पच्या सुरक्षेसाठी पाठवण्यात आले आहेत.

close