पुणे दरोडा प्रकरणी आणखी चौघांना अटक

June 30, 2010 10:21 AM0 commentsViews: 8

30 जून

पुण्यातील महेंद्र ज्वेलर्स दरोडा प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे पेट्रोल बॉम्ब सापडले आहेत.

विश्रामबाग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरिक्षक मोतींचंद राठोड यांनी ही माहिती दिली. अरुण उदय डे , सचिन भोसले, अनिरुद्ध गोखले आणि विजय मोहिते अशी आज ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुण्यातील वारजे परिसरातून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये नागरिकांनी दोन दरोडेखोरांना पकडले होते.

त्यानंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. आता आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता अटक झालेल्या आरोपींची संख्या अकरावर पोहोचली आहे.

close