‘कोकण रेल्वेसाठी काँग्रेसकडून आंदोलन नाही’

June 30, 2010 11:14 AM0 commentsViews: 4

30 जून

कोकण रेल्वेबाबत काँग्रेस कुठलेही आंदोलन करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आंदोलनाची घोषणा करणार्‍या नारायण राणेंना, एकटे पाडण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

राणेंच्या आंदोलनापासून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला बाजूला सारले आहे. त्यामुळे आता नारायण राणे आपल्या आंदोलनाबाबत काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनी दुसर्‍यांदा राणेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

याअगोदर शिक्षणसेवक भरतीवरून मुख्यमंत्र्यांनी राणेंची कोंडी केली होती. आणि त्यानंतर आता कोकण रेल्वेवरूनही दोघांमध्ये शितयुद्ध सुरू झाले आहे.

close