जॉर्ज फर्नांडीस यांना भेटण्यासाठी धरणे

June 30, 2010 11:25 AM0 commentsViews: 5

30 जून

जेष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नाडीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या भावांवर धरणे आंदोलन करण्याची वेळ त्यांच्या भावांवर आली आहे. जॉर्ज फर्नांडीस यांच्या पत्नी लैला कबीर यांनी ही भेट नाकारली आहे.

जॉर्ज फर्नांडीस यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत येत्या 7 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे सध्या सरकारी निवासस्थान खाली करण्याचे काम सुरू आहे. या घरात आपले फर्निचर असल्याचा दावा जॉर्ज यांच्या निकटवर्तीय जया जेटली यांनी केला.

पण हे फर्निचर घ्यायला जॉर्ज यांच्या पत्नी लैला कबीर यांनी विरोध केला. जया यांना त्यांनी दारातच रोखले. तसेच जॉर्ज यांच्या भावांनाही घरात येण्यास त्यांनी मज्जाव केला.

जॉर्ज फर्नांडीस सध्या अल्झायमर आजारामुळे त्रस्त आहे. या आजारामुळे त्यांनी आपली स्मरणशक्ती गमावली आहे.

close