मोहन जोशींकडे मागितला हिशोब

June 30, 2010 2:14 PM0 commentsViews: 2

30 जून

मोहन जोशींनी अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा नियामक मंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत नाकारण्यात आला आहे.

जोशी जोपर्यंत अमेरिकेत झालेल्या विश्व नाट्यसंमेलनाचा संपूर्ण हिशेब देत नाहीत, तोपर्यंत त्यांना अध्यक्षपद सोडता येणार नाही, असा निर्णय नियामक मंडळाने घेतला आहे. यापुढील कारवाई होईपर्यंत नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष हेमंत टकले हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असा निर्णयही नियामक मंडळाने घेतला आहे.

close