कल्याण, डोंबिवलीत रिक्षाचालकांचा संप

June 30, 2010 3:03 PM0 commentsViews: 2

30 जून

अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, कल्याण आणि डोंबिवली या शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षा चालकांनी आज अचानक बंद पुकारला.

त्यामुळे सकाळी शाळेत जाणार्‍या मुलांचे हाल झाले. फक्त 3 विद्यार्थ्यांची रिक्षातून वाहतूक करण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक असल्याचे रिक्षा संघटनेचे म्हणने आहे.

शासनाच्या या निर्णयाविरोधात कल्याण आरटीओ ऑफिसवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

close