नुसरतचा मारेकरी सापडला

July 1, 2010 3:43 PM0 commentsViews: 1

1 जुलै

कुर्ल्यात झालेल्या अल्पवयीन मुलींच्या तीन हत्यांपैकी एका हत्येचा गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नुसरत शेख या नऊ वर्षांच्या मुलीचा 19 जून रोजी मृतदेह सापडला होता. तिचा मारेकरी जावेद रेहमान याला पोलिसांनी अटक केली आहे.

नुसरतच्या नखांमध्ये सापडलेल्या रक्ताची डीएनए टेस्ट करण्यात आली होती. ही टेस्ट जावेदच्या डीएनएशी जुळते.

जावेद हा दहावी शिकलेला आहे. तो कुर्ला भागातच केबल नेटवर्कचे काम करत होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, जावेदने दिलेल्या माहितीवरून आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वजाफा शेख असे त्याचे नाव असून त्याला नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

पण नुसरतच्या हत्येपूर्वी सानिया आणि अंजली या दोन मुलींची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील आरोपी वेगळा असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

close