बेस्ट फाईव्हसाठी सुप्रिम कोर्टात याचिका नाही

July 1, 2010 5:13 PM0 commentsViews: 3

1 जुलै

एका आठवड्यानंतरही बेस्ट फाइव्ह प्रकरणी राज्य सरकारने सुप्रिम कोर्टात अपील केलेले नाही.

आता पाच जुलैला सुप्रिम कोर्टात अपील करण्यात येईल. त्यामुळे अकरावी ऍडमिशनचा प्रश्न अजूनही कायम आहे. 13 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे.

बेस्ट फाइव्ह प्रकरणाचा निकाल येऊन आता आठवडा लोटला आहे. पण सरकारला या प्रकरणाच्या निकालाची अधिकृत प्रत अजूनही मिळालेली नाही. ही प्रत न मिळाल्याने सरकारला सुप्रिम कोर्टात अपिल करण्यासाठी उशीर होत आहे.

कोर्टाला 5 जुलैपर्यंत सुट्टी आहे. तरी लाखो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे. त्यामुळे सरकार सुट्टीच्या कोर्टातही अपिल करू शकते. सरकारसोबतच शिक्षण मंडळही अपील दाखल करणार आहे.

या दिरंगाईमुळे 11 वीच्या ऍडमिशनला मात्र उशीर होणार आहे.

close