बेस्ट फाईव्हचा घोळ कायम

July 2, 2010 9:33 AM0 commentsViews: 6

2 जुलै

बेस्ट फाईव्हचा जीआर मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे.

या प्रकरणी सुप्रीम कोर्टात अपिलात जाण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला खरा, पण प्रत्यक्षात हायकोर्टाची ऑर्डर राज्य सरकारच्या हातात यायलाच अजून बराच वेळ लागणार आहे.

त्यानंतर त्याचा अभ्यास करुन अपिल केले जाईल. त्यानंतर त्यावरची सुनावणी सुप्रीम कोर्टात होईल. आणि त्यानंतर त्याचा निकाल येऊन अकरावी प्रवेशाचा निर्णय होईल.

कोर्टातून निकालपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेलाच किती वेळ लागणार आहे तो बघूया…

मुंबई हायकोर्टाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश न्या. जे एन पटेल यांची बदली आता कोलकाता हायकोर्टात मुख्य न्यायाधीश म्हणून झाली आहे.

बेस्ट फाईव्ह केसच्या निकालपत्रावर न्या पटेल आणि न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांची सही होणं गरजेचं आहे. ती सही झालेली नाही.या सहीसाठी मुंबई हायकोर्टाच्या रजिस्ट्रारनी बेस्ट फाईव्हचे टाईप केलेले निकालपत्र कोलकत्त्याला पाठवावे लागेल.

सीनिअर न्यायाधीश म्हणजे न्यायमूर्ती पटेल यांच्या सहीनंतर ज्युनिअर न्यायाधीश या निकालपत्रावर सही करतील.

महाराष्ट्र सरकारला हे निकालपत्र वेबसाईटवर किंवा प्रत्यक्ष मिळण्यासाठी कोर्टाकडे अर्ज द्यावा लागेल. त्यानंतरच ती प्रत सरकारच्या हातात पडेल.

या प्रकियेला अजून एक आठवडा लागेल, असा अंदाज कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

close