धोणी लग्नाच्या बेडीत

July 5, 2010 3:23 PM0 commentsViews: 53

5 जुलै

भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने आता एका नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

आपली बालमैत्रीण साक्षी रावत हिच्याशी त्याने लग्न केले.

डेहराडूनमध्ये विश्रांती रिसॉर्टवर हा विवाह सोहळा पार पडला.

या सोहळ्यात जवळचे नातेवाईक आणि मित्र सहभागी झाले होते.

धोणीने नक्षीकाम केलेली काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर साक्षी लाल रंगाच्या भरजरी साडीमध्ये नटली होती.

धोणीच्या लग्नासाठी भारतीय टीममधील त्याचे सहकारी सुरेश रैना, आशिष नेहरा, हरभजन सिंग हे उपस्थित होते.

close