विद्यार्थिनीची प्रवेशाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

July 8, 2010 5:56 PM0 commentsViews: 4

8 जुलै

शाळेत प्रवेश घेण्यासाठी एका विद्यार्थिनीने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. तिला पुन्हा त्याच शाळेत प्रवेश दिला, तर ती ट्रॉमामध्ये जाईल, असे अजब कारण कोर्टाने यासाठी दिले आहे.

अधिश्री कुलकर्णी असे या मुलीचे नाव आहे. अधिश्री ही गोरेगावमधील विबग्योर या आयसीएसई बोर्डाच्या शाळेची विद्याथिर्नी होती.

तिने शाळेत नववीच्या प्रवेशासाठीची फीदेखील भरली होती. पण शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधी तिला शाळेतून काढून टाकण्यात येत असल्याचे पत्र देण्यात आले.

एवढेच नव्हे तर तिने भरलेली फीदेखिल परत करण्यात आली. प्रवेश कायम ठेवावा, अशी मागणी करणारी याचिका अधिश्रीने दाखल केली होती.

close