जेम्स लेनचे पुस्तक बंदीमुक्त

July 9, 2010 10:02 AM0 commentsViews: 2

9जुलै

अमेरिकन लेखक जेम्स लेनने शिवरायांवर लिहिलेल्या वादग्रस्त पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे. यामुळे राज्य सरकारला पुन्हा एकदा चपराक बसली आहे.

'शिवाजी किंग इन इस्लामिक इंडिया' असे या पुस्तकाचे नाव आहे. शिवाजी महाराजांची या पुस्तकातून बदनामी होत असल्याचे आक्षेप घेत राज्य सरकारने 15 जानेवारी 2004 रोजी या पुस्तकावर बंदी घातली होती.

लेनने 2003मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक, भावना दुखावणारे लेखन असल्याची जनतेची भावना आहे.

राज ठाकरेंचा इशारा

दरम्यान महाराष्ट्रातील कुठल्याही दुकानात हे पुस्तक ठेऊ देणार नाही, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

close