सचिननं दोस्ती निभावली

October 23, 2008 11:41 AM0 commentsViews: 4

23 ऑक्टोबर, मुंबईमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते त्याचा बालपणीचा दोस्त सिध्दार्थ पारधे यांच्या ' कॉलनी ' या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील एमआयजी क्लबवर करण्यात आलं. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सचिननं तिसर्‍या टेस्टसाठी दिल्लीला जाण्यापुर्वी खास वेळ काढुन दोस्ती निभावली.सचिन तेंडुलकर ज्या साहित्य सहवास कॉलनीत वाढला, त्या कॉलनीतील अनुभव सिध्दार्थनं आपल्या पुस्तकात मांडले आहेत. सिद्धार्थचा भाऊ रमेश हा सचिनचा सेक्रेटरी आहे. लहानपणापासून रमेश आणि सिद्धार्थ सचिनसोबत होते. या सगळ्या आठवणींसह सिद्धार्थने त्यांच्या वैयक्तिक जीवनातील संघर्षही शब्दबद्ध केला आहे.

close